Monday, July 25, 2011

विज्ञान आश्रमा चे संस्थापक डॉ.श्रीनाथ शेषगिरी कलबाग



विज्ञान आश्रमा चे संस्थापक डॉ.श्रीनाथ कलबाग यांचा जन्म 23 ऑक्टो 1928 रोजी दस-याच्या दिवशी झाला. त्यांच्या वडीलांचे पॉप्युलर फार्मसी नावाचे मुंबर्इत दुकान होते. शाळेत असल्यापासूनच विज्ञानाकडे त्यांचा कल होता. घरी ते विविध प्रयेाग करत उदा. साबून तयार करणे, रसायने वापरून कपडे ब्लिंचिंग करणे , कागदावर छपार्इ इ.|कॉलेज मध्ये असतांना त्यांनी पारले कंपनीच्या कामगारांना त्यांचे अधिकार व कर्तव्यांची जाणिव करून देण्यासाठी साक्षरता वर्ग चालवले. त्यांनी शालेय शिक्षण रॉबर्ट मनी व बी.एस्,सी ही पदवी रॉयल इन्स्टिटयुट ऑफ सायन्स , मुंबर्इ येथे मिळवली आणि एम.एस.सी(टेक) ही पदवी UDCT, मुंबर्इ मधून 1952 मध्ये मिळवली. 1953 साली अमेरिकेतील शिकागो येथील (Ilinois University ) मध्ये त्यांनी खाद्य तंत्रज्ञानातील ( food technology) मधील PhD (विद्यावाचस्पती) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रा.कुमाराओ यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अमेरिकेतील 2 वर्षाच्या वास्तव्यात डॉ.कलबाग जवळपासच्या ग्रामीण भागात फिरत होते व तेथील लोकांचे विशेषत: शेतर्कयांचे जीवनाचे निरिक्षण करत होते. त्यांच्या लक्षात आले की तेथील शेतकरी केवळ शेतीतच नव्हे तर रोजच्या जीवनात पण विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यांच्या या निरिक्षणातच भविष्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमाच्या स्थापनेची मुळे दडलेली आहेत. 
डॉ.क्टरेट मिळवल्यावर त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना अमेरिकेतील एका नामवंत कंपनीत संशोधक पदावर काम करण्याचे सुचवले. परंतू श्रीनाथ कलबागांनी भारतात परतण्याचा निश्चय केला. भारतात आल्यावर 1955 साली ते Central Food Technological Research Institute (CFTRI) या म्हैसूर येथील संस्थेत सहाय्यक वैज्ञानिक संशोधक  अधिकारी म्हणून रूजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी 1963 पर्यत काम केले. त्यानंतर ते हिंदुस्थान लिवर लिमिटेड या कंपनीच्या संशोधक विभागात अभियांत्रिकी शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून रूजू झाले. त्यावेळी मुलाखती च्या वेळीच त्यांनी आपण वयाची 26 वर्षे शिक्षणासाठी म्हणजे ब्रम्हचारी आश्रमासाठी दिली. तशी पुढील 26 वर्ष गॄहस्थाश्रमात घालवणार व त्यानंतर ची वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे ग्रामीण भागात जाऊन काम करण्यात व्यतित करणार असे सांगितले होते.  त्या निश्चयाप्रमाणे 1982 मध्ये स्वेच्छा निवॄत्ती घेतली. 

मुंबर्इतील डॉ.व्ही.जी.कुलकर्णी व पुण्यातील थोर शिक्षणतज्ञ श्री.जे.पी.नार्इक यांच्या बरोबर त्यांनी शिक्षणातील प्रश्नाविषयी चर्चा केली| मुंबर्इत फिरतांना त्यांनी बरीचशी कुठलेही शालेय शिक्षण न घेतलेली मुले आयुष्यात यशस्वी झालेली पाहीली होती. ही मुले त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली कौशल्ये ही मुले कशी आत्मसात करतात याचा त्यांनी अभ्यास केला. ही सर्व जण शिकण्याच्या नैसर्गिक पध्दतीनेम्हणजेच काम करत करत शिकतात. शिकण्याची ही पध्दत इतकी परिणामकारक आहे की आपण ज्यांना अभ्यासात म्हणतो त्यांनासुध्दा ती प्रभावीपणे शिकवू शकते. खरे म्हणजे जर 10वी पर्यंत गळती होणा-या 90 टक्के मुलांना ही पध्दत उपयोगी असेल तर हीच शिक्षणाची खरी पध्दत असली पाहीजे हे डॉ.कलबागांच्या लक्षात आले.यापूर्वी पण म.गांधी नी नयी तालीममध्ये हाताने काम करत करत शिकणेया पध्दतीचा पुरस्कार केला होता. मात्र नयी तालीम म्हणजे तंत्रज्ञान व विज्ञान व आधुनिकीकरणाला विरोध असा भ्रम सर्वसामान्यांचा झाला होता. त्यामुळे या कल्पनांवर स्वतंत्रपणे काम करून त्याला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक होते. या सर्व विचार मंथनातून विज्ञान आश्रमाची स्थापना झाली. जे.पी. नार्इक व डॉ.चित्रा नार्इक यांच्या सहकार्याने पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेचाएक स्वतंत्र स्वायत्त विभाग म्हणून विज्ञान आश्रमाचे काम सुरू झाले. जे.पी.नार्इकांनी त्यांच्या परिचयातील 4 ते 5 गावांची नावे डॉ.कलबागांना सुचवली. त्यापैकी पाबळ हे गाव दुष्काळी होते तसेच शहरापासून व हामरस्त्यापासून दुर होते| खेडयात असणारे सर्व प्रश्न इथे उपस्थित होते अशा परिस्थितीत जर आपण शिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला तर तो भारतातील सर्व गावांमध्ये राबवता येर्इल ही पाबळ गाव निवडण्यामागील कारण होते. पाबळ मधील ऑर्इल मिल मध्ये विज्ञान आश्रमाचे काम सुरू झाले. त्यानंतर गावाने व शासनाने गावाजवळील 5 एकर जागा या प्रयोगाला दिली. त्याठिकाणीच आज विज्ञान आश्रम उभा आहे.
  सुरूवातील गावक-यांबरोबर राहून डॉ.कलबागांनी त्यांच्या गरजा व विकासाच्या संकल्पना यांचा  जवळून अभ्यास केला.त्यातून ग्रामीण तंत्रज्ञानहा अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमाची डॉ.कलबागांनी विकसित केलेली तत्वे पुढील प्रमाणे :
•     विद्यार्थांना परिणामकारक पध्दतीने शिकवण्यासाठी हाताने काम करत करत शिकवणे. थेाडक्यात कामाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना विविध संकल्पना ,विज्ञान , भाषा व गणित शिकवणे.
•     विद्यार्थ्यांना बहुविध कौशल्यांचे शिक्षणदेणे ज्या योगे त्यांच्या बुध्दीमत्तेला विविध पैलू पडतील|
•           विद्यार्थ्यांनी लेाकोपयोगी कामे करावीत. विद्यार्थ्यांनी विविध सेवा गावक-र्यांना पुरवाव्यात. त्यासेवांचा मोबदला गावाने शाळेला दयावा, ज्यायोगे गावाला सेवा मिळतील व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
•           शिक्षकाने पण उद्योजक असावे. शिक्षकाकडे पण प्रत्यक्ष करून दाखवता येतील अशी कौशल्ये असावीत. लोकोपयोगी सेवांमधील उत्पन्नाचा वाटा शिक्षकाला मिळावा.
•           शाळा हे गावामध्ये समुचित तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी चे केंद्र् व्हावे. समाजातील तांत्रिक समस्या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थे पर्यंत पोहचवण्याचे शाळा हे माध्यम असावे.
•           विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या दैनंदिनीचा भाग म्हणून विविध माहीती च्या नोंदी ठेवल्या जाव्या व त्याचा उपयोग नियोजनासाठी व्हावा.

शिक्षणातून गावातील विकास व  विकास कामांमधून शिक्षणहे डॉ.कलबागांच्या शिक्षण संकल्पनेचे ब्रीद होय. डॉ.कलबांगाच्या प्रयोगाचे यश लगेचच दिसू लागले. ग्रामीण तंत्रज्ञान अभ्यासक्रम पुर्ण झालेली शेकडो विद्यार्थी आज स्वत:चे व्यवसाय करत आहेत. गावातील गरजा व समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी स्वत:च प्रयत्न करायचे हा पण विज्ञान आश्रम संकल्पनेचा एक भाग आहे. त्यातून पाबळ मधील आश्रमाला भेडसावर्णाया समस्यांना उत्तर म्हणून विविध तंत्रज्ञान विषयक प्रकल्प आश्रमाच्या विद्यार्थ्यांनीं तयार केले. पाबळ जियोडेसिक डोम ही कमी खर्चातील घरे ,भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी पाणी तपासण्याचे यंत्र , बैलाला वर्षभर पुरेल एवढा चारा उपलब्ध नाही म्हणून छोटया शेतीसाठी कमी अश्वशक्तीचा मेक बूलट्रॅक्टर अशी कितीतरी तंत्रज्ञान आश्रमात डॉ.कलबागंच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. आश्रमाच्याच विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग सुरू केले व त्या तंत्रज्ञानात सुधारणाही केली. लातूर च्या भुकंपाच्या वेळी गुबाळ हे गाव पाबळ डोम वापरून पुर्नवसित करण्यात आले. गुजरात भुकंप , आंध्र चे चक्री वादळग्रस्त भागात ही पुर्नवसनासाठी पाबळ डोम वापरले गेले आहेत. पाणी शोधण्याच्या यंत्राचा वापर करून हजारो विंधन विहीरींचे संशोधन आश्रमाने केले.
1990 च्या सुमारास आश्रमात पहील्यांदा संगणक आला. 1998 मध्ये मल्टिमिडीया तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतून कॉम्प्युटर धडेबनवायला डॉ.कलबागांनी सुरूवात केली. अशा प्रकारचे धडे शिक्षकांना सहाजपणे बनवता यावे म्हणून डॉ.कलबागांनी , श्री रिचर्ड पार्इप यांच्या सहकार्याने रियालटी लर्निंग इंजिनया सॉफ़्टवेअरची निर्मिती केली.
डॉ.कलबाग नेहमी म्हणत विज्ञान आश्रमाचे महत्वाचे संशोधन म्हणजे आमची शिक्षणपध्दती आश्रमातील इतर शोध व तयार झालेले उद्योजक व ग्राम विकासाची कामे ही तर त्या शिक्षण पध्दतीची फळे आहेत. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स & टेक्नॉलॉजीविभाग , कपार्ट , हिंदुस्थान लिव्हर , टाटा ट्रस्ट अशा अनेक संस्थांनी आश्रमाची कल्पना विकसित होण्यासाठी अर्थसहाय्य केले.
पाबळ मधील विज्ञान आश्रमही शिक्षणाची प्रयोग शाळा आहे. प्रत्येक गावापर्यंत ही शिक्षणसंकल्पना न्यायची असेल तर औपचारिक शिक्षण पध्दतीतच बदल व्हायला हवा हे डॉ. कलबाग ओळखून होते. 1987 पासून पाबळ  मधील भैरवनाथ विद्यामंदीरातइ.8 वी ते 10 वी साठी ग्रामीण तंत्रज्ञानहा अभ्यासक्रम सुरू केला गेला. पुढील वर्षी तो जवळच्या तीन शाळांमध्ये राबवला गेला. शासनाची परवानगी घेउन या प्रयोगाचे मुल्यमापन केले गेले आणि मग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याअभ्यास समितीने या विषयाला शासन मान्य विषय म्हणून मान्यता दिली. अभ्यास समिती ने या विषयाची उपयुक्तता ग्रामीण विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागालाही आहे म्हणून या विषयाचे नाव मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख Introduction to Basic Technology (IBT)असे ठेवले. अभ्यासक्रमातील पहीला पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून याला V1 हा सांकेतिक क्रमांक मिळालेला आहे|
शाळेचे सध्याचे स्वरूप , पुस्तिकी अभ्यासाला महत्व , शिक्षकांचा कार्यभार , तासिका इ. तांत्रिक बाबी यांचा तसेच अभ्यासक्रमातील  शेक्षणिक उद्यीष्टये यांचा बारकार्इने अभ्यास करत डॉ.कलबागांनी नीट ची आखणी केली , त्यासाठीची पुस्तके , व्हीडीओ , सीडी तयार केल्या. डॉ.कलबागंच्या निधनापर्यंत 23 शाळांमध्ये नीट राबवला गेला. या कल्पनेचे सार्वत्रिकरण व्हावे यासाठी डॉ.कलबाग नेहमी आग्रही राहीले होते. 
तज्ञांकडून तांत्रिक समस्यांना उत्तरे मिळण्यासाठी इंटरनेट चा उपयोग होऊ शकेल हे डॉ.कलबागांनी ओळखले. पाबळ मध्ये इंटरनेट देण्यास कुठलीही कंपनी तयार नसल्याने डॉ.कलबागांनी आय.आय.टी चेन्नर्इ च्या सहकार्याने पाबळ व जवळपासच्या गावांना वायरलेसच्या तंत्रज्ञाने इंटरनेट सेवा सुरू केली. इंटरनेटच्या व संगणकाच्या सहाय्याने गावांना विविध सेवा देण्याचा विचार त्यांनी केला. 
ज्या काळात विज्ञान म्हणजे प्रयोग शाळेत करण्याचा गहन विषय अशी धारणा होती. त्याकाळात डॉ.|कलबागंनी कार्य केंदिशिक्षण पध्दती किती परिणामकारक असते हे नापास विद्याथ्र्यांना सोबत घेऊन सिध्द केले. त्याच बरोबर ही शिक्षण पध्दती कश्या प्रकारे आजच्या शिक्षणात राबवता येर्इल हे प्रत्यक्ष राबवून दाखवले. त्या कार्यक्रमाला शासनाची विषय म्हणून मान्यता पण मिळवली.
डॉ.|कलबागांनी विविध शिक्षण समित्यांवर सदस्य म्हणून काम केले| भारत सरकार ने कम्युनिटी पॉलिटेक्निकसाठी नेमलेल्या कलबाग समिती चेते अध्यक्ष होते. त्यांनी कम्युनिटी पॉलिटेक्निक च्या माध्यमातून शिक्षण व विकास ही कल्पना कशी राबवता येर्इल याची संपुर्ण योजना त्यात मांडली.हा अहवाल भारताच्या संसदे समोर ठेवला गेला व शिफारशी स्विकारल्या गेल्या.
ग्रामीण तंत्रज्ञानाचा अर्थ कमी खर्चातील , कमी दर्जाचे असे तंत्रज्ञान असा नव्हे.उलट ग्रामीण भागाचा वेगाचा विकास करायचा असेल तर आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे. असे तंत्रज्ञान कमी खर्चात कसे उपलब्ध करायचे याचा विचार करावा मात्र तंत्रज्ञानाची निवड सर्वोत्तम असावी असा डॉ.कलबागांचा आग्रह होता. अमेरिकेतील मॅशेसेस्युसेटस इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) च्या सहकार्याने विकसित झालेल्या फ़ॅब लॅब संकल्पनेत डॉ.कलबागांचा महत्वाचा सहभाग होता. लोकांना त्यांच्या दैनंदिन समस्यांवर उत्तर शोधता यावेत यासाठी तंत्रज्ञान विकासाची सोय उपलब्ध करून दयावी , त्या योगे विद्यार्थी , शेतकरी , युवक इ. कोणाही कल्पक व्यक्तीला मनातील कल्पना प्रत्यक्षात आणता यावी यासाठी अत्याधुनिक मशिन असलेली अमेरिके बाहेरील पहीली फ़ॅब लॅब पाबळ येथे सुरू झाली. आज अनेक देशात फ़ॅब लॅब ची कल्पना स्विकारली जात आहे.
डॉ. कलबागांच्या कार्याचा समाजाने नातू फाऊंडेशन , जमनालाल बजाज पुरस्कार आदी अनेक पुरस्कार व सन्मान देऊन गौरव केला. डॉ.कलबागांच्या पत्नी श्रीमती मिरा कलबाग (अम्मा) यांनी पण त्यांना बरोबरीने साथ दिली. विशेषत: महीलांच्या उपक्रमात त्यांनी पुढाकार घेतला.  डॉ.कलबागांचे 30 जुलै 2003 साली वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले.

आज विज्ञान आश्रमाचा कार्यक्रम महाराष्ट्रा बरोबर महाराष्ट्रा बाहेर ही राबवण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहे. शासकीय पातळीवर ही या कल्पना स्विकारल्या जात आहे. शिक्षण कार्य केंदीकरण्यासाठी देशभरात जे महत्वाचे प्रयेाग झाले त्यात विज्ञान आश्रमाचा प्रयोग नक्कीच महत्वाचा आहे.शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकासया कल्पनेच्या विकास व प्रसाराच्या कार्यासाठी डॉ.कलबाग नेहमीच स्मरणात राहतील.


योगेश कुलकर्णी
28 ऑगस्ट 2008
(संदर्भ : श्री.तारानाथ कलबाग यांचा लेख)

No comments:

Post a Comment